महत्वाच्या बातम्या

 चोप येथे सार्वजनिक बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील चोप येथे सार्वजनिक बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २० नागरिकांनी रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. चोप येथील ग्रामपंचायत सभागृहात दुर्गा उत्सव मंडळ, रक्त बँक गडचिरोली व उपकेंद्र चोप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात आले. सर्वप्रथम रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांसह रक्तसंकलन चमूचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. शुभम नागपूरकर यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसमोर मांडली. या रक्तदान शिबिरात २० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये ज्ञानेश्वर बनपूरकर युवकाने सर्वप्रथम रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन सुभारंभ केला. गावातील ज्येष्ठ लोकांनी सुद्धा आपला सहभाग नोवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी गावातील दुर्गा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतिष्ठित मंडळी युवक बहूसंख्येने उपस्थित होते. रक्तदात्यांना मंडळाकडून चहा व अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos