अखेर फरार असलेले तिन आरोपी पोलिसांना आले शरण


- बग्गूजी ताडाम अपहरण प्रकरण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
विधानसभा निवडणूकीदरम्यान अपक्ष उमेदवार बग्गू ताडाम अपहरण प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीपैकी तिन आरोपींनी काल १०  नोव्हेंबर ला आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर होऊन पोलिसांना शरण आले. पोलिसांनी तिनही आरोपींना अटक केली असून अटक अरण्यात आलेल्या आरोपीमध्ये लारेन्स आनंदराव गेडाम (१९) , स्वप्नील सिंगुजी ताडाम (२५) , व पंकज मुर्लीधर दुग्गे (२४) यांचा समावेश आहे.
मागिल महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीदरम्यान काॅंग्रेस उमेदवार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लाॅरेन्स गेडाम व त्यांच्या साथीदारांनी आपले अपहरण केल्याची तक्रार अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम यांनी आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. बग्गु ताडाम यांच्या तक्रारीवरूण आरमोरी पोलीसांनी आनंदराव गेडाम, त्यांचा मुलगा लारेन्स गेडाम , जिवन पाटील नाटसह अन्य आरोपीविरोधात विविध कलामान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील सर्वच आरोपी हे फरार झाले होते.
सदर प्रकरणातील काही आरोपींनी अटकपूर्व जामीण मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु जिल्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात धाव घेतली होती. परंतू नागपूर खंडपिठाानेही अटकपूर्व जामीण नाकारला. त्यामुळे आरोपींना पोलीसांना शरण आल्याशिवाय पर्याय नव्हता. पोलीसांनी सुध्दा आरोपींना शरण येण्यासाठी भाग पाडले होते.
बऱ्याच  दिवसापासून फरारा असलेले या प्रकरणातील तिन आरोपींनी काल १० नोव्हेंबर ला आरमोरी पोलीस स्टेशन येथे हजर होऊन शरण झाले. पोलीसांनी आरोपी लारेन्स आनंदराव गेडाम, स्वप्नील सिगुजी ताडाम, पंकज मुर्लीधर दुग्गे यांना अटक केली आहे. प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार दिगांबर सुर्यवंशी हे करित आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-11


Related Photos