१८ सप्टेंबर ला सक्षमतर्फे निःशुल्क हातपाय व कॅलिपर्स प्रत्यारोपन शिबीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
समदृष्टी, क्षमता विकास व अनुसंधान मंडळ ‘सक्षमच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी कृत्रीम हातपाय व कॅलीपर्स (जयपूर फूट) निःशुल्क प्रत्यारोपन शिबिराचे आयोजन स्थानिक गुर्जर क्षत्रीय समाजवाडीत  करण्यात आले आहे. 
श्री महावीर विकलांग सहायता समिती जयपूर कोटा शाखा, सक्षम संस्था गोंदिया, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व श्री गुर्जर क्षत्रीय समाज गोंदिया संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता करण्यात येईल. यावेळी डॉ. राजा दयानिधी, स्व. प्रमोद मेमोरियल संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. या शिबीराचे आकर्षण असे की, शिबीरात गरजू लाभाथ्र्यांना ईलेक्ट्रॉनिक हात सुध्दा बसविण्यात येणार आहे. तेव्हा या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सक्षम संस्था गोंदिया शाखेचे अध्यक्ष बी. प्रभाकर राव, प्रकल्प निर्देशक डॉ. एस. विद्यासागर मोहन, सचिव जितेंद्र अग्रवाल, सहसचिव कमल चिपेकर, उपाध्यक्ष डॉ. क. पारधी, कोषाध्यक्ष मदन शर्मा, सहकोषाध्यक्ष दीपक गौतम यांनी केले आहे.   Print


News - Gondia | Posted : 2018-09-15


Related Photos