शिक्षण विभागाचे लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बिडकर महाविद्यालयातील प्राचार्य भास्कर गोविंदराव आंबटकर, ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीमती उषाकिरण अरूणराव थुटे  , प्रयोशाळा सहाय्यक चंद्रशेखर उत्तमराव कुटे यांना १० हजार रुपयाची  लाच रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे रामनगर वर्धा येथील रहिवासी असून ते जुलै २०१९ मध्ये बिडकर महाविदयालय हिंगणघाट येथुन सेवा निवृत्त झाले होते. त्यांनी स्वतःचे पेन्शन सुरू करण्याकरिता बिडकर महाविदयालयात रितसर अर्ज सादर केला होता. परंतू सदर पेन्शन संबंधिचे कागदपत्रे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, नागपूर यांच्याकडे पाठविले नसल्याने तक्रारदार महाविदयालयाचे प्राचार्य भास्कर गोविंदराव आंबटकर यांना भेटले असता प्राचार्य आंबटकर यांनी तक्रारदारास पेन्शन संबंधाची कागदपत्रे तयार करून सहसंचालक कार्यालयात पाठविण्याकरीता तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीमती उषाकिरण अरूणराव थुटे यांच्याकरीता ५५ हजार १५५ रूपयाची लाच रक्कम देण्याची मागणी केली. दरम्यान तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भेटून तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनिय शहानिशा करून शिक्षण विभागातील  प्राचार्य व अध्यक्ष अधिकारी यांच्या विरूध्द योजनाबध्दरित्या सापळा कारवाई केली. ४ नोव्हेंबर रोजी पडताळनी कारवाई दरम्यान प्राचार्य भास्कर गोविंदराव आंबटकर यांनी तक्रारदारांना पेन्शन संबंधाने कागदपत्रे सहसंचालक कार्यालयात पाठविण्याकरीता  ७ व्या वेतन आयोगातील पगार वाढीतील ५५ हजार १५५ रूपये लाचेची मागणी केली व तक्रारदाराच्या विनंती वरून प्राचार्य यांनी तक्रारदारास संस्थेचे अध्यक्ष यांना भेटण्यास सांगितले व ६ नोव्हेंबर रोजीच्या पडताळणी कारवाईत तक्रारदार व संस्था अध्यक्ष श्रीमती उषाकिरण अरूणराव थुटे यांच्यातील भेटी दरम्यान कागदपत्रांच्या तडजोडणीअंती ३० हजार रूपये महाविदयालयाचे प्राचार्य भास्कर आंबटकर यांचेजवळ देण्याबाबत संस्था अध्यक्ष थुटे यांनी तक्रारदारास सांगुन स्वतः करीता तसेच महाविदयालयाचे प्राचार्य करीता लाचेची मागणी करूण तडजोडीअंती ३०  हजार पैकी पहिला हप्ता म्हणून  १० हजार रुपये लाच रक्कम प्रयोगशाळा सहाय्यक चंद्रशेखर कुटे यांच्याहस्ते स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहात पकडले.
याबाबत महाविदयालयाचे प्राचार्य भास्कर गोविंदराव आंबटकर, संस्था अध्यक्ष श्रीमती उषाकिरण अरूणराव थुटे , प्रयोगशाळा सहाय्यक चंद्रशेखर उत्तमराव कुटे सर्व रा.सु.बिडकर महाविदयालय हिंगणघाट यांच्या विरूध्द पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधिक्षक राजेश दुद्दलवार अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुहास चैधरी, पोहवा संतोष बावनकुळे, नोपोकाॅ रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, पोकाॅ सागर भोसले, पोकाॅ विजय उपासे, प्रदिप कुचनकर, मपोका अपर्णा गिरजापूर, मनपोका पल्लवी बोबडे, मपोकाॅ स्मीता भगत, पोकाॅ कैलास वाल्दे, चापोकाॅ निलेश महाजन , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा यानी केली.

 
  Print


News - Nagpur | Posted : 2019-11-08


Related Photos