महाराष्ट्रातीलच कांदा बनला संपूर्ण देशाचा आधार ; इतर राज्यातील कांदा संपण्याच्या स्थितीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नाशिक :
कांदा बाजारपेठेत कांद्याचे भाव सध्या उच्चांकी दर गाठत आहे. एक क्विंटल कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळतोय. देशात यंदा सर्वत्र कांद्याच विक्रमी उत्पादन झाले असतांनाही, कांदा उत्पादक शेतकरी नेहमीप्रमाणे उपेक्षितच राहतो आहे.
नाशिक जिल्ह्यातील आडगाव मधील भास्कर शिंदे, यांना दोन एकर कांदा लागवडीस यांना वीस हजार रुपयांचा खर्च आला. यावेळी त्यांना दोन हजार ते चार हजार रुपयांनी मिळणारे बियाणे तब्बल सहा हजार रुपये किलोने विकत घ्यावे लागले. त्यामुळे १८ हजार खर्च केवळ बियाण्यासाठी आला आहे.
नांगरणी, कोळपणी, लागवडीसह ५ हजार रुपयापर्यंत खर्च आला. १४ हजार रुपयांची खते, औषधे १० हजार रुपये त्यांच्या फवारणीसाठी मजुरीचा खर्च अडीच हजार रुपये आला. नंतर निंदनी आणि मालकाढणीसाठी दहा हजार रुपये एकरी खर्च. तर चाळ साठवण करण्यासाठी चार हजार रुपये खर्च आला. असा एकूण एकरी खर्च ८० हजारच्या घरात गेला.
रब्बीच्या कांद्याची आवाक जास्त होत असल्यानं भाव कमीच असतो. साठवणूक करून कांदा बाजारात कमी होण्याची वाट बघतो. बाजारत भाव वाढायला सुरुवात झाली की टप्प्याटप्प्यान शेतकरी कांदा बाजारात आणतो. या संपूर्ण परिस्थितीला सरकारी धोरण जबाबदार असल्याचं व्यापारी सांगताय. तर सरकारने अचानकपणे कुठलाही निर्णय घेतांना व्यापाऱ्यांना विचारात घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त होतेय. 
कांद्याची बाबतीत असलेली परिस्थिती भविष्यात देखील गंभीर होणार आहे. इतर राज्यात कांदा जवळपास संपत आलाय. तर महाराष्ट्रातील कांदाच बनला संपूर्ण देशाचा आधार. किरकोळ बाजारात मिळत असलेल्या भावात आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावात मोठी तफावत आहे. मात्र बाजारात येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना कांदा महाग पडतोय. जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्यानं ग्राहकांच आर्थिक गणित कोलमडत आहे. 
व्यापारी साधारणपणे किरकोळ बाजारात पाठवताना फेरफार करत किलोमागे दहा रुपयांची तफावत ठेवत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे यासर्व प्रक्रियेवर आधारभूत किंमत बाजारात अंमलबजावणी करण्याची किंवा  हमी भाव जाहीर करून दिलासा देण्याची गरज आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-08


Related Photos