राज्यात आदर्श ठरलेल्या अपंग मतदाराला तीन चाकी सायकल भेट


- दिव्यांग असुनही नदी पोहून बजावला मतदानाचा हक्क
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रकाश दुर्गे / अहेरी :
राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान नुकतेच संपन्न झाले.तरुणांपासून तर शंभरी पार केलेल्या अनेक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.पण राज्यात एक चर्चचा विषय ठरला तो दिव्यांग असलेल्या प्राजून गावडे यांचा.भामरागड तालुक्यातील अतीदुर्गम भागातील तुमरकोठी गावातील दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या प्राजून लिंगु गावडे (४३) यांनी निश्चय केला की कसेही करुन आपण मतदानाचा हक्क बजावायचा.त्याला स्वगावाहून  सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठी येथील मतदान केंद्रावर जायचे होते.सकाळीच तो मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघाला कसेबसे करुन तो नदिपर्यंत पोहचला पण तिथून पुढे जाण्यासाठी नदि पात्रात नाव(डोंगा)नव्हती तेंव्हा त्यानी नदीच्या पाण्यामधून  पोहून जात कोठी येथील मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला. प्राजून यांच्या या धाडसाचे राज्यात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. दिव्यांग असुनही मतदानाचा हक्क बजावून त्यानी सर्वांसाठी आदर्श निर्माण केला. तुमरकोठी हा गाव विकासापासून कोसो दुर आहे.पक्का रस्ता नाही.आरोग्य,शिक्षण, विज व दुरध्वनी सेवा नाही.या गावाहून दुसऱ्या गावाला जाण्याचा नदी लागते पण त्या नदीवर पुल नाही. अशा अनेक कठीण परिस्थितीत येथील लोक जीवन जगत आहेत.
प्राजून या दिव्यांगाचे धाडस व एक जागरूक नागरिक म्हणून त्यानी केलेल्या कामाची दखल घेत काही सेवाभावी संस्था पुढे येत त्यानी प्राजूनला मतदतीचा हात दिला.आदर्श मित्र मंडळ पूणे,श्रीनृसींह लक्ष्मी पतसंस्था बल्हारपूर व आधार सेवाभावी संस्था आलापल्ली यांचे वतीने स्वत: प्राजून गावडे यांचे गावी जात तिन चाकी सायकल भेट दिली.आपल्याला भेटायला लांबून लोक आलेत व ते आपल्याशी प्रेमाने बोलत आहेत हे पाहून प्राजून भारावून गेला.व मला जगण्याचे अधीक बळ मीळाले अशी बोलकी प्रतिक्रिया त्यानी व्यक्त केले.
यावेळी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील,प्रभारी अधिकारी शिंदे,सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चरनजीत सलुजा,पत्रकार रोमीत तोंबर्लावार,प्रशांत ठेनाले व ग्रामस्थ उपस्थितीत होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-07


Related Photos