बाजार समिती मध्ये धान्य खरेदीच्या टोकण करीता शेतकऱ्यांनी तयार केली 'चपलांची' रांग


- ५०० च्या वर शेतकरी समितीच्या आवारात    
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पवनी : 
येथील बाजार समिती मध्ये  देण्यात येणाऱ्या धान्य खरेदीची टोकण मिळावी याकरिता शेतकऱ्यांची गर्दी वाढली असून गर्दीत  रांगेत उभे राहण्याचा कंटाळा आल्याने शेतकऱ्यांनी शक्कल लढवीत चक्क पायातील 'चपलांची'  रांग तयार केली.
शासनाचे आधारभूत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे हस्ते बुधवार ६ नोव्हेंबर ला दुपारी २ वाजता खरेदी विक्री सहकारी संस्था पवणीचे सभापती माणिकराव ब्राह्मणकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला शंभराच्यावर शेतकरी बांधव उपस्थित होते. धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन शेतकऱ्याचं धान्य मोजून करण्यात आले मात्र उपस्थित  शेतकऱ्यांना त्याच वेळेस टोकण न दिल्याने शेतकरी नाराज होता.
त्यामुळे आपला धान लवकरात लवकर मोजल्या जाउन मिळणारा मोबदला लवकर मिळावा याकरिता परिसरातील शेतकरी टोकण मिळविण्यासाठी रात्री दहा वाजता पासूनच बाजार समितीच्या आवारातच संपूर्ण रात्र काढावी लागली
शेतकऱ्यांना रात्रीला थांबण्याकरिता बाजारसमिती कडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती तर आज सकाळी संपूर्ण शेतकरी उन्हात उभे असून बाजारसमिती कडून मंडप सुद्धा टाकण्यात आले नाही.  
त्यामुळे शेतकरी बांधवात बाजार समिती व खरेदी विक्री या दोन्ही समितीचे विरोधात शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला असून शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता टोकण देणाऱ्या टेबलांच संख्या वाढविण्यात यावे, पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, धान्य मोजणीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच तालुक्यात फक्त पाच धान्य खरेदी केंद्र असल्याने प्रत्येक केंद्रावर पंधरा वीस गावे जोडली गेल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे केंद्राची संख्या वाढविण्यात यावी अशा विविध  मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.   Print


News - Bhandara | Posted : 2019-11-07


Related Photos