न्यायप्रविष्ट जमिनीच्या वादातून गौरकार यांची निर्घृृण हत्या


- फिर्यादीच्या तक्रारीवरुन ८ संशयित इसम पोलिसांच्या ताब्यात

- आष्टी येथील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/गडचिरोली :
चामोर्शी तालुक्याच्या आष्टी येथील शिवाजी चौकापासून अवघ्या सहाशे मीटर अंतरावरील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर बळवंत चंद्रशेखर गौरकार ५० रा. जैरामपूर (ह. मु. आनंदनगर, चंद्रपूर) यांची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या केली. सदर घटना काल, ५ नोव्हेंबरला रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मतकाचे दूरध्वनी संच, दुपटृटा, सत्तुर हस्तगत करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, मृतक व त्यांचे सहकारी सुरेश कुत्तरमारे एका स्कुटीने सदर रस्त्यावरुन जात असताना त्यांना रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने व लाठीने त्यांच्या डोक्यावर व शरिराच्या इतर भागावर वार करुन जिवानीशी ठार केले.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी आपल्या वाहनासह बळवंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फिर्यादी मृतकाचे भाऊ शालीक चंद्रशेखर गौरकार ४६ यांच्या तोंडी तक्रारीवरुन आष्टी पोलिसांनी ८ संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे. त्यामघ्ये प्रमोद लखमापुरे, प्रदीप लखमापुरे, कपील रामचंद्र पाल, संजय पोटवार, विनायक पाल, राकेश बेलसरे, सुधील पाल, मोरेश्वर पाल सर्व रा. आष्टी यांचा समावेश असून त्यांच्याविरूद्ध १५४/२०१९ अन्वये कलम ३०२, ३४१/१२० ब, १४७, १४८, १४९ भादंवी, सहकलम १३५ मुपोका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नजनीश निर्मल हे करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-06


Related Photos