जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या भेटीदरम्यान पाविमुरांडा आरोग्य केंद्रात केवळ शिपायाची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ गडचिरोली :
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती अजय कंकडालवार यांनी आज चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. याप्रसंगी केवळ एक शिपाई कर्तव्यावर आढळून आला. यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
शिपाई गेडाम हे उपस्थित होते. आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा अर्जही टाकलेला नव्हता. आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक मशीन सुद्धा नव्हती. कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत घेतलेल्या एकही सुट्टीचा अर्ज केला नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे अनुपस्थित कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याच्या सूचना उपाध्यक्षांनी दिल्या.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-06


Related Photos