दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने शिक्षक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा
: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होउन शिक्षक जखमी झाल्याची घटना आज ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धानोरा - रानवाही मार्गावरील खोब्रागडी नदीजवळ घडली.
पुरूषोत्तम मनिराम मेश्राम (४९) असे जखमी शिक्षकाचे नाव असून ते रानवाही येथील जि.प. शाळेत कार्यरत आहेत. शिक्षक मेश्राम हे एमएच ३३ एक्स ९६१६ क्रमांकाच्या दुचाकीने रानवाहीकडे जात होते. दरम्यान खोब्रागडी नदीजवळ अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला कोसळले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले. मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. शिक्षक मेश्राम यांच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर जखम झाली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-05


Related Photos