तेलंगणात महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळले


वृत्तसंस्था / हैदराबाद :  महिला तहसिलदाराला ऑफिसमध्ये घुसून जिवंत जाळल्याची घटना तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या महिला तहसीलदाराचा मृत्यू झाला आहे. तर या महिला तहसिलदाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात हा क्रूर प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती तहसिलदार कार्यालयात आली. त्यानंतर त्या व्यक्तीने तहसिलदार विजया यांच्यावर पेट्रोल टाकून आग लावून दिली. आगीचा भडका उडाल्याने त्यात गंभीररीत्या भाजून सदर महिला तहसिलदाराचा मृत्यू झाला. तर त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकजण गंभीर जखमी झाला. दरम्यान, आरोपी व्यक्ती फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही व्यक्ती कोण होती, तसेच त्या व्यक्तीने हे कृत्य का केले हे समजू शकलेले नाही.
  Print


News - World | Posted : 2019-11-04


Related Photos