रेगुंठा येथे शेतजमिनीच्या वादातून महिलेची हत्या


- मृतक महिलेची सून गंभीर जखमी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिरोंचा : 
तालुक्यातील रेगुंठा येथे शेतजमिनीच्या वादातून एका इसमाने महिलेची हत्या केल्याची घटना काल ३  नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेत मृतक महिलेची सून गंभीर जखमी झाली आहे.
राजक्का व्येंकटी बोल्ले (४५) असे मृतक महिलेचे नाव आहे तर समय्या अंकुलू दुर्गम (४०) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेत मोनिका मल्लेश बोल्ले ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 
प्राप्त माहितीनुसार आरोपी समय्या दुर्गम आणि मृतक राजक्का बोल्ले यांच्यात शेतजमिनीवरून वाद झाला. यावेळी आरोपीने राजक्कावर हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. तर मोनिका बोल्ले ही जखमी झाली. रेगुंठा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-04


Related Photos