महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि त्याचा शपथविधी शिवतीर्थावर होईल : खासदार संजय राऊत


- पत्रकार परिषदेत १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा केला दावा 
वृत्तसंस्था / मुंबई
: राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने आता घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि त्याचा शपथविधी शिवतीर्थावर होईल असं राऊत पत्रकार परिषदेत ठामपणे म्हणाले.   शिवसेनेला १७० आमदारांचं पाठबळ आहे आणि ही संख्या १७५ पर्यंत देखील जाऊ शकते असा राऊतांचा दावा आहे.  राष्ट्रवादी (५४), काँग्रेस (४४) व इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा १७० पर्यंत जाईल, असा विश्वास राऊत यांना आहे. या आकडेवारीसंदर्भात आणि सत्तास्थापनेच्या संभाव्य पर्यायांबाबत त्यांनी रोखठोकमध्येही लिहिलं आहे. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-03


Related Photos