माथेफिरूकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
नागपूर विमानतळावरील एअर इंडियाच्या काऊंटरवर एका माथेफिरूनं फोन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून पोलीस धमकी देणाऱ्या माथेफिरूचा शोध घेत आहेत.
माझे नातेवाईक अद्याप घरी पोहोचले नाहीत. एअर इंडिया आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ते घरी पोहोचले नाही तर मी विमानतळावरच मुख्यमंत्र्यांना उडवून देईन, अशा धमकी देणारा फोन डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडियाच्या काऊंटरवर आला. प्रथमदर्शनी ही व्यक्ती माथेफिरू वाटत असली तरी घटनेचं गाभीर्य ध्यानात घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसंच ती व्यक्ती कोण होती, त्याचे नातेवाईक कोणत्या विमानानं येणार होते, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं होतं. मंत्रालयात आलेल्या पत्रानं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधीही फेब्रुवारी महिन्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पंकज कुंभार नावाच्या एका व्यक्तीच्या फेसबुक पेजवरुन ही धमकी देण्यात आली होती.  Print


News - Nagpur | Posted : 2019-11-03


Related Photos