उपविभागीय अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांच्या निवडणूकीतील कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक


- उत्कृष्ट नियोजनामुळे निवडणूक यशस्वीरित्या पडली पार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील उपविभागीय अधिकारी तथा नुकत्याच पार पडलेल्या गडचिरोली विधानसभा निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमिका पार पाडलेल्या डाॅ. इंदूराणी जाखड यांचे निवडणूकीतील उत्कृष्ट नियोजनामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.  एक महिला अधिकारी म्हणून त्यांनी निभावलेले निवडणूकीतील कार्य अगदी वाखाणण्याजोगे आहे, असे गौरवोद्गार काढले जात आहे.
विधानसभा निवडणूकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून ६८.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच संपूर्ण निवडणूक ही निर्विघ्नपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यापासूनच डाॅ. इंदूराणी जाखड यांनी सबंधितांना सुचना देवून आपआपली जबाबदारी सोपवूनू दिली. तसेच त्यांच्याकडून निवडणूक कार्यात कोणतीही कसूर राहू नये याकरीता नियंत्रण ठेवले. भरारी पथके, बंदोबस्तावरील पथके, नाकाबंदी पथके तैनात करून  निवडणूकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होउ नये यासाठी उपाययोजना केल्या. निवडणूकीतील उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूकीशी सबंधित कर्मचारी यांच्या बैठका आयोजित करून आवश्यक त्या सुचना देणे, निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सुचनांचे पालन करून दररोज अद्यावत केलेल्या कामांची माहिती पुरविणे, माध्यमांशी समन्वय ठेवणे, अशी कामे त्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे. विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. ईव्हीएमबाबत असलेल्या गैरसमजूती व संभ्रम दूर केला, कर्मचाऱ्यांना  योग्य प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केले. 
मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी डाॅ. इंदूराणी जाखड यांनी प्रयत्न केले. स्पीप उपक्रमांतर्गत कलापथके, भित्तीपत्रके, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी रॅली, स्वाक्षरी अभियान आदी उपक्रम राबविले. शाळा, महाविद्यालयांमध्ये डाॅ. जाखड ह्या स्वतः जावून नवीन व युवा मतदारांमध्ये जनजागृती केली. यामुळे नवख्या मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. डाॅ. जाखड यांच्या नियोजनामुळे निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही. तसेच उत्कृष्ट मतदान झाले. यामुळे डाॅ. जाखड यांचे कौतुक होत असून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक होताना दिसत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-02


Related Photos