२१ वर्षांच्या युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी १५ वर्षांच्या मुलाला अटक


वृत्तसंस्था /  मुंबई : २१ वर्षांच्या वर मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका १५ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. लग्नाच्या बहाण्याने या मुलाने बलात्कार केला असा आरोप या युवतीने केला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने तिचा जबाब नोंदवला आहे.
 युवतीने केलेल्या आरोपानंतर तिची वैद्यकीत तपासणीही करण्यात आली. ज्यानंतर या मुलीवर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या मुलाने आम्ही दोघंही घरातून पळून गेलो होतो असं म्हटलं आहे. या प्रकरणातला मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील एका हॉटेलमध्ये या मुलाने मला डांबले होते आणि माझे लैंगिक शोषण केले तसंच माझ्यावर बलात्कार केला असं पीडित मुलीने सांगितलं आहे. याबाबत अधिक तपास केला असता हे दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि पंधरा दिवसांपूर्वी पळून गेले होते अशी माहिती समोर आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आणि तिच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदर प्रकरण आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डापुढे मांडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-02


Related Photos