झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; पाच टप्प्यात मतदान, २३ डिसेंबरला निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
  झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या ठिकाणी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या, १२ डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यात, १६ डिसेंबर रोजी चौथ्या टप्प्यात आणि २० डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज जाहीर केलं. 
येत्या ५ जानेवारी रोजी झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या पाच उपायुक्तांनी १७-१८ ऑक्टोबर रोजी झारखंडचा दौरा केला होता. झारखंडमध्ये एकूण १९ जिल्हे नक्षल प्रभावित असून त्यातील ६७ मतदारसंघ नक्षल प्रभावित आहेत.  Print


News - World | Posted : 2019-11-01


Related Photos