घरगुती गॅसच्या किमतीत तब्बल ७६.५ रुपयांची वाढ


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   गॅस कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे वाढलेल्या महागाईमध्ये सामन्यांच्या खिशाला आणखीन कात्री लागणार आहे.  इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ७६.५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 
 मुंबईत गॅसची किंमत ६५१ रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. ऑक्टोबरमध्ये या गॅस सिलिंडरची   किंमत ६०५ रुपये होती. व्यावसायिक गॅस सिलिंडर  च्या दरातही ११९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दरवाढीनंतर मुंबई आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी अनुक्रमे ५७४.५० रूपये आणि ६२० रूपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकात्यामध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ६०५ रूपये मोजावे लागतील.  दरम्यान, १९ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरची किंमत दिल्लीत १ हजार ८५ रूपये, तर कोलकात्यात आणि मुंबईत अनुक्रमे १ हजार १३९ रूपये आणि १ हजार ३२ रूपये इतकी झाली आहे.  Print


News - World | Posted : 2019-11-01


Related Photos