महत्वाच्या बातम्या

 अतिदुर्गम गट्टा येथे आंतरराष्ट्रीय मलेरिया दिन साजरा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्य परमं धन्नम गट्टा येथे आज २५ एप्रिल २०२४ ला जागतिक मलेरिया दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 

डॉ. ओंकार वरपल्लीवार वैद्यकीय अधिकारी बोलतांना म्हटले कि, २५ ऍप्रिल हा जगभरात मलेरिया दिन साजरा करण्यात येतो, प्रतिबंध आणि नियंत्रित करण्याबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात येतो. या वर्षी हिवताप रोगाचा भार कमी करण्यासाठी आणि जिव वाचवण्यासाठी नवा संकल्प वापरा या घोषवाक्यानुसार हिवताप नियंत्रणासाठी प्रयत्न करूया मलेरिया हा साथींच्या आजाराने पसरणारा रोग आहे. गडचिरोली जिल्हा हा ७८ टक्के जंगलाने व्यापलेला असल्यामुळे डासांसाठी पोषक वातावरण बनलेला आहे, असे नागरीकांना माहिती दिली. 

यावेळी उपस्थित आरोग्य सहाय्यक चव्हाण, आरोग्य सहाय्यक अलीवार, प्रयोग शाळा तंत्रज्ञ शिकदार, आरोग्य सहाय्ययिका हेडो, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos