महत्वाच्या बातम्या

 ट्रक ने दुचाकीस्वारास चिरडले : आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी 


- सुरक्षा रक्षकांची बघ्याची भूमिका 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : एका दुचाकीस्वारास ट्रकने चिरडल्याची घटना मार्कंडा (कं) क्रासींगवर काल २४ एप्रिल ला ४.३० वाजताचे सुमारास घडली. 

माहितीनुसार, एमएच ३४ बिजी ४२२४ हा ट्रक आष्टी कडून मार्कंडा (कं) कडे भरधाव वेगाने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्र एमएच ३३ के २१४५ ला जब्बर धडक दिल्याने दुचाकी समोरील चाकात फसली दुचाकीवरील आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी जखमी झाले आहेत. गंभीर इसमाचे नाव प्रभाकर लोणारे (५२) रा. मार्कंडा (कं) तर जखमी नातवंडाची नावे रिदांश कैलास लोणारे (७), सिदांश कैलास लोणारे (५) असे आहे. 

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रभाकर लोणारे ची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. दोन नातवंडावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

या ठिकाणी क्रासींग असल्याने मार्कंडा (कं) कडून येणाऱ्या वाहनांना आष्टी कडून येणारे वाहन दिसून येत नाहीत. तेव्हा सदर सुरक्षा रक्षकांनी त्याच वळणावर दोन्ही बाजूला तत्परतेने नजर ठेवल्यास असे अपघात टाळण्यासाठी मदत होते. यावर संबंधीतांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos