महत्वाच्या बातम्या

 24 वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मिट क्रीडा महोत्सव - 2022


- कबड्डी (पुरुष) स्पर्धेकरीता अमरावती विद्यापाठाचा संघ घोषित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे 3 ते 07 डिसेंबर दरम्यान होणा-या 24 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्टस् मिट क्रीडा महोत्सव -2022 कबड्डी (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पुरुष संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे होणार आहे.
खेळाडूंमध्ये संत गाडगे महाराज महाविद्यालय, वलगावचा आदेश वानखडे, अजय तायडे, अभिषेक यादव, व अंकुश कडू, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाडचा आकाश चव्हाण व प्रतिक करवटे, जी.एस. महाविद्यालय, खामगावचा ओम अहीर व सुरज घाटे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा गणेश लाहे, इंदिरा महाविद्यालय, कळंबचा यशवंत मोकलकर, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा रुपेश कासदेकर, एम.ई.एस. महाविद्यालय, मेहकरचा नागेश चव्हाण, धाबेकर महाविद्यालय, खडकी, अकोलाचा फरहान शाह व प्रफुल्ल खोपे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा विलास खंडारे, महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय, पातूरचा सुनिल गोटे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा कुणाल जिचकार याचा समावेश आहे.
सर्व खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos