राजुरा विधानसभा क्षेत्रातून काॅंगेसचे सुभाष धोटे अडीच हजार मतांनी विजयी, ॲड. वामनराव चटप यांचा पराभव


- भाजपचे विद्यमान आमदार राहिले तिसऱ्या  स्थानी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या राजुरा विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकीत काॅंग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी २ हजार ५०९ मतांनी विजय मिळविला आहे. सुभाष धोटे यांना स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड. वामनराव चटप यांनी लढत दिली आहे.
या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार ॲड.संजय धोटे हे या निवडणूकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. ॲड. वामनराव चटप यांनी सुभाष धोटे यांना तगडी लढत दिली. अखेरच्या क्षणी धोटे यांनी विजय मिळविला. सुभाष धोटे यांना ५९ हजार ९६८ मते मिळाली. भाजपचे ॲड. संजय धोटे यांना ५१ हजार ५१ मते मिळाली तर स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड. वामनराव चटप यांना ५७ हजार ७२७ मते मिळाली. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार गोदरू पाटील जुमनाके यांनी ४३ हजार ३०६ मते घेतली आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-24


Related Photos