महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आपली नोंदणी संबंधित खरेदी केंद्रावर करावी


- मका खरेदीसाठी तीन खरेदी केंद्र निश्चित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप व रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मधील शेतकरी उत्पादित धान/भरडधान्य आदिवासी विकास महामंडळास विक्रीकरीता प्रादेशिक कार्यालय, गडचिरोलीचे  कार्यक्षेत्रांर्गत ५४ व अहेरी कार्यक्षेत्रांतर्गत ३९ असे एकुण ९३ धान खरेदी केंद्र जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी मंजुर केलेले आहे. 

रब्बी हंगामातील धान/भरडधान्य महामंडळास विक्री करणेसाठी मुख्य कार्यालय, नाशिक यांचे सुचनेनुसार रब्बी हंगामातील धान/भरडधान्य विक्रीकरीता शेतकरी नोंदणीचा कालावधी ०१ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ निश्चित केलेला आहे. तरी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान/भरडधान्य नोंदणी व विक्रीकरीता ई-पिक पेरा नोंदणी, e-kyc प्रमाणपत्र, चालु हंगामाचा ७/१२, ३० एप्रिल २०२४ सायंकाळ ५.०० वाजेपर्यंत नोंदणी करावी. NeML पोर्टलवर नोंदणीसाठी रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्रे कार्यान्वीत झालेले आहेत. मका खरेदीसाठी कुरखेडा (तालुका कुरखेडा), धानोरा (तालुका धानोरा) व मार्कंडा (तालुका चामोर्शी) हे तीन खरेदी केंद्र निश्चित केलेले आहे. तरी शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आपली नोंदणी संबंधित खरेदी केंद्रावर करावी, असे प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ यांचेद्वारा आवाहन करण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos