निवडणुकीच्या तोंडावर भाजप - शिवसेनावासी झालेल्या १९ आयारामांचा दारुण पराभव


वृत्तसंस्था / मुंबई :  निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपा - शिवसेनेमध्ये  प्रवेश केलेल्या आयारामांना जनतेने मोठा दणका दिला आहे. या ३५ आयारामांपैकी १९ उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे.
इतर पक्षांतून भाजपात आलेल्या वैभव पिचड (राष्ट्रवादी), हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), गोपालदास अग्रवाल (काँग्रेस), गोपिचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी), धैर्यशील कदम (काँग्रेस), रमेश आडसकर, भरत गावित, उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
तर, जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप सोपल (राष्ट्रवादी), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), शेखर गोरे (राष्ट्रवादी), रश्मी बागल (राष्ट्रवादी), विजय पाटील, संजय कोकाटे, दिलीप माने (काँग्रेस), नागनाथ क्षीरसागर, निर्मला गावित (काँग्रेस), प्रदीप शर्मा या शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. पराभव झालेल्या या आयाराम उमेदवारांमध्ये शिवसेनेचे ११ तर भाजपाच्या ८ उमेदवारांचा समावेश आहे. या निकालाद्वारे पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने दिलेले हा सर्वांत मोठा संदेश आहे की आयाराम कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांचा पराभव होऊ शकतो. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-10-24


Related Photos