आरमोरी विधानसभा क्षेत्रातून कृष्णा गजबे २१ हजार ५०० हून अधिक मतांनी विजयी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकीची मतमोजणी पार पडली असून या विधानसभा क्षेत्रातील जनतेने पुन्हा एकदा भाजपाला मताधिक्क्य दिले आहे. विद्यमान आमदार कृष्णा गजबे हे तब्बल २१ हजार ५५० मतांनी विजयी झाले आहेत. गजबे यांना ७३ हजार ८६६ मते मिळाली आहेत. 
आ. कृष्णा गजबे यांनी काॅंग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंदराव गेडाम यांचा पराभव केला आहे. गेडाम यांना ५२ हजार ३१६ मते मिळाली आहेत.  या विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार सुरेंद्रसिंह चंदेल हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. आ. कृष्णा गजबे यांची आघाडी पाहता सकाळपासूनच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आ. गजबे यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात असून भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड जल्लोष करीत आहेत. देसाईगंज शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. 

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-24


Related Photos