साकोली विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे नाना पटोले १२ हजार मतांनी विजयी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
निवडणूकीच्या काळात चांगलेच वादग्रस्त राहिलेल्या साकोली विधानसभा क्षेत्रातून काॅंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी १२  हजार मतांनी विजय मिळविला आहे. पटोले यांनी भाजपाचे विद्यमान राज्यमंत्री डाॅ. परिणय फुके यांचा पराभव केला आहे.
नाना पटोले यांनी २०१४  च्या लोकसभा निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. मात्र काही काळानंतर त्यांनी थेट पंतप्रधानांना विरोध करीत खासदारकीचा राजिनामा देवून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांना काॅंग्रेसने राष्ट्रीय  पातळीवरील जबाबदारी दिली. २०१९  च्या लोकसभा निवडणूकीत पटोले यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्यांना साकोली विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट देण्यात आले. यामुळे डाॅ. परिणय फुके यांच्यासमोर चांगलेच आव्हान होते. 
डाॅ. परिणय फुके आणि नाना पटोले यांच्या समर्थकांमध्ये मारहाणीच्यासुध्दा घटना निवडणूकीपूर्वी घडल्या. यामुळे हा विधानसभा क्षेत्र चांगलाच चर्चेत होता. मतमोजणीत ११  व्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिलेले डाॅ. परिणय फुके यांना मागे टाकत नाना पटोले यांनी १२  हजार मतांनी विजय मिळविला आहे. यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-24


Related Photos