महायुतीतील चार मंत्र्यांचा पराभव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.   भाजपा, शिवसेनेच्या जागा कमी होताना दिसत आहेत. महायुतीला पावणे दोनशेचा आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे. त्यातच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या पाच सहकाऱ्यांचा पराभव झाला आहे. 
कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचे मंत्री राम शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला. जलसंवर्धन मंत्री असलेल्या शिंदेंना राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी  धक्का दिला. रोहित पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना परळीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंनी पंकजा यांना जवळपास २०  हजार मतांनी पराभूत केलं. भाजपा नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांचादेखील पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी भेगडेंना धक्का दिला आहे. . जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांना पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी त्यांचा पराभव केला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-10-24


Related Photos