चामोर्शी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मोहफुलाची दारू पकडल्यानंतर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
दिनेश रामेश्वर लिलारे असे पोलिस उपनिरीक्षकाचे तर चंद्रशेखर निलकंठ काकडे असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ निर्माण झाली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-24


Related Photos