अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काॅंग्रेसचा जल्लोष, धर्मरावबाबा आत्राम विजयी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र जल्लोष केला जात आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपाचे विद्यमान आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांचा पराभव केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत धर्मरावबाबा आत्राम यांचा पराभव करीत राजे अम्ब्रीशराव आत्राम हे राज्यमंत्री पदी विराजमान झाले होते. मात्र पुन्हा एकदा अहेरी विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी धर्मरावबाबा आत्राम यांना संधी दिली आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांना 60 हजार 13 मते मिळाली. भाजपाचे उमेदवार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना  44 हजार 555  मिळाली. काॅंग्रेसचे उमेदवार दीपक आत्राम यांना 43 हजार 22 मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार मधुकर सडमेक यांना 3 हजार 623, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार नागेश तोर्रेम यांना 1 हजार 57, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. लालसु नागोटी यांना 2 हजार 381, अपक्ष अजय आत्राम यांना 1 हजार 559, अपक्ष कैलाश कोरेत यांना 2 हजार 279 तर अपक्ष दिनेश मडावी यांना 2 हजार 91 मते मिळाली आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-24


Related Photos