भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजयी


वृत्तसंस्था / नांदेड :   महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ जागांचा निकाल आज जाहीर होत आहे. यात मराठवाड्यातली आठ जिल्ह्यांमध्ये अनेक प्रतिष्ठेच्या लढाई होत आहेत. यातील भोकर विधानसभा मतदार संघातून अशोक चव्हाण रिंगणात होते. सर्वच एक्झिट पोलनं अशोक चव्हाणांना पराभवाचा धक्का दिला होता. मात्र चव्हाणांनी आपल्या हक्क्याच्या जागेवर विजय खेचून आणला. मतमोजणी सुरू झाल्यापासून अशोक चव्हाण आघाडीवर होते. अखेर त्यांनी भाजपच्या बापूसाहेब गोरठेकर यांचा दारूण पराभव केला.
नांदेड जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. या जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत चव्हाण कुटुंबियांचे वर्चस्व राहिले आहे. देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांचा नांदेड हा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ मध्ये देशात मोदी लाट असताना लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. असाच प्रकार यंदाच्या निवडणूकीत दिसून आला. यंदाच्या निवडणूकीत भाजपने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांना फोडून भाजपकडून त्यांना भोकरमध्ये उमेदवारी दिली. त्यामुळं चव्हाण विरोधात गोरठेकर असा जरी समना असला तरी, या मतदारसंघात खऱ्या अर्थानं पुन्हा चव्हाण विरोधात चिखलीकर अशीच लढत होती.  Print


News - Rajy | Posted : 2019-10-24


Related Photos