महत्वाच्या बातम्या

 चाईल्ड लाईन १०९८ गडचिरोलीच्या वतीने चाईल्ड लाईन से दोस्ती व बाल हक्क सप्ताहाचा समारोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था द्वारा संचालित चाईल्ड लाईन १०९८ गडचिरोलीच्या वतीने १४ नोव्हेंबरला बालक दिवस, चाईल्ड लाईन से दोस्ती तथा बालकाची सुरक्षितता (बालकांचे हक्क व त्यांचे सुरक्षितता) या संदर्भात चाईल्ड लाईन से दोस्ती व बाल हक्क सप्ताह १४ नोव्हेंबर २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात आले. बालकांचे हक्क व बालकांविरुध्द अत्याचार याविषयी माहिती देऊन अशा अत्याच्यारांना प्रतिबंध करणे हि सर्वांची जबाबदारी आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली, बालकांवरील अत्याचार विशेषतः लैंगिक शोषण या बाबतचे अत्याचार कोणत्याही भीतीने लपवून न ठेवता अशा अत्याच्यारांबाबत पोलिसांना त्वरित अवगत करावे जेणेकरून तत्काळ कारवाई होईल. बालकांवरील होणारे अत्याचार व त्याचे होणारे परिणाम याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे. अत्याचारांची माहिती चाईल्ड हेल्प लाईन १०९८ किंवा स्थानिक पोलीस ठाणे येथे माहिती देणे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, बालकांविरुध्द हिंसा करणे हि बाब अयोग्य आहे हे लोकांना समजावून सांगणे. किशोरवयीन मुलांमध्ये सेलफोन व्यसनाधीनता व इतर व्यसनाविषयी जागृती करणे. ० ते १८ वयोगटातील ज्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. अशी बालके आपल्या परिसरात किंवा शेजारी आढळले तर नि:संकोचपणे तत्काळ चाईल्ड लाईन १०९८ या राष्ट्रीय टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन बालकास त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यास सहकारी करावे. असे आवाहन चाईल्ड लाईन च्या वतीने करण्यात आले. व या निमित्याने मौजा वसा, काटली, चांदाळा, गोगाव, आंबेशिवणी, बोदली, विसापूर, सावरगाव, इंदाळा, कनेरी, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी चाईल्ड लाईन से दोस्ती कार्यक्रम घेण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चाईल्ड लाईन गडचिरोलीचे प्रकल्प समन्वयक मा. छत्रपाल भोयर, समुपदेशिका अवंती वाटे, टिम मेंबर भारती जवादे, मयूरी रकतशिंगे, अविनाश राऊत, देवेंद्र मेश्राम, वैशाली दुर्गे, संदीप लाडे, तसेच स्वयंसेवक प्रकाश गुरनुले यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos