एक्झीट पोल: जनमताचा कौल भाजप, शिवसेनेच्याच बाजूने


- विदर्भात कोण मारणार बाजी?
- गडचिरोली जिल्ह्यातील मतदार कोणाला देणार संधी ? 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. राज्यातील ३  हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता उमेदवारांच्या भाग्याचा फैसला २४ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यापूर्वीच जनमताचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये भाजप - शिवसेनेच्याच बाजूने कौल दिसून येत आहे. तर विदर्भातील अनेक मतदारसंघांमध्ये नेतृत्व बदलाची शक्यता आहे. 
राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी भाजप १३५ ते १४० जागांवर निवडूण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शिवसेनेला ८० ते ८२ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होत आहे. काॅंग्रेस २२ ते २४ , राष्ट्रवादी काॅंग्रेस ४० ते ४२ तर इतर ७ उमेदवारांना आमदार होण्याची संधी मिळण्याची शक्यता जनतेच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातून अनेक उमेदवार रिंगणात होते. यापैकी आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजप - काॅंग्रेस आणि अपक्ष सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यात लढत होती. या विधानसभा क्षेत्रात भाजपचे कृष्णा गजबे यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विद्यमान भाजपसमोर काॅंग्रेस, शेकाप तसेच अपक्ष व अन्य पक्षांचेही आव्हान होते. मात्र भाजपचे आमदार डाॅ. देवराव होळी पुन्हा एकदा बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये  त्रिशंकु स्थिती वर्तविली जात होती .  मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतविभाजनामुळे भाजपचे उमेदवार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांचा विजय होईल असे बोलल्या जात आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात काॅंग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे संदिप गड्डमवार यांच्यात लढत होती. दोन्हीही उमेदवार तगडे मानले जात आहे. मात्र वडेट्टीवार यांच्या विजयाची  शक्यता कमीच मानली आहे. 
चिमूर विधानसभा क्षेत्रातून विद्यमान आमदार बंटी भांगडिया यांना काॅंग्रेसचे उमेदवार सतिश वारजूरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सांदेकर यांचे आव्हान होते. मात्र या क्षेत्रातून भांगडिया पुन्हा विजयी होण्याचे संकेत आहेत. वरोरा - भद्रावती क्षेत्रातून शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे व काॅंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होती. हे क्षेत्र आधी शिवसेनेच्या पारड्यात होते. परंतु धानोरकर हे काॅंग्रेसमध्ये गेल्याने या क्षेत्रात काॅंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार नाना शामकुळे यांना अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार हे आव्हान देत आहेत. यामध्ये नमके कोण विजयी होईल, हे २४ ऑक्टोबरलाच कळेल. या क्षेत्रात काॅंग्रेसने ऐनवेळी जोरगेवार यांचे तिकीट कापून महेश मेंढे यांना उमेदवारी दिली होती. मात्र मेंढे हे निवडणूकीत फारसे चर्चेत दिसले नाहीत.
राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपाचा विजय निश्चित मानल्या जात आहे. त्यांच्याविरोधात काॅंग्रेसने विश्वास झाडे यांना उमेदवारी दिली आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपाचे उमेदवार विद्यमान आमदार संजय धोटे यांना काॅंग्रेसचे उमेदवार माजी आमदार सुभाष धोटे व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गोदरू पाटील जुमनाके यांचे आव्हान आहे. यामुळे या क्षेत्रातून कोण बाजी मारेल हे सांगता येणार नाही. 
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्राची निवडणूकही चांगलीच चर्चेत आहे. या विधानसभा क्षेत्रात भाजपाचे विद्यमान मंत्री डाॅ. परिणय फुके यांच्यासमोर काॅंग्रेसचे दिग्गज नेते नाना पटोले यांचे आव्हान आहे. या मतदारसंघात मोठमोठ्या घडामोडी झाल्या आहेत. यामुळे आता २४ ऑक्टोबरलाच या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व समजणार आहे. 
राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्षेत्र असलेल्या नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या आमदारकीचा राजिनामा देवून काॅंग्रेसमध्ये गेलेले डाॅ. आशिष देशमुख यांचे आव्हान आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे विजयी होतील , असा अंदाज वर्तविला जात आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-21


Related Photos