महत्वाच्या बातम्या

 वासेरा येथे ११ ते १५ एप्रिल दरम्यान जयंती महोत्सवाचे आयोजन 


- बौध्द नगर कमेटी तथा रमाबाई महिला मंडळ, वासेरा यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे बौध्द नगर कमेटी तथा रमाबाई महिला मंडळ, वासेरा यांचे वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ पर्यंत श्रावस्ती बुध्दविहाराचे प्रांगणात घेण्यात येत आहे.

११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्य अभिवादन घेण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता स्पर्धा परिक्षा व सायंकाळी ७ वाजता बुध्द भीम गितांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात सादरकर्ते प्रबोधन कलामंच, वासेरा हे असणार आहेत. १२ एप्रिलला सकाळी ७ वाजता मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

१३ एप्रिलला सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर व सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १४ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य मिरवणूक व अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. १५ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आटोपून रात्रौ ७ वाजता समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सादरकर्ते भिमेश भारती व संच, नागपुर हे असणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आयोजक बौध्द समाज नगर कमेटी तथा रमाबाई महिला मंडळ वासेरा यांनी आवाहन केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos