महत्वाच्या बातम्या

 निशुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रिडा  संघटना व क्रिडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १५ ते ३० एप्रिल दरम्यान ग्रिष्मकालीन   निशुल्क क्रिडा  प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिर वय ८ ते १८ वर्ष वयोगटातील मुलामुलींकरीता आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरात  सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण शिबिरामध्ये व्हॉलबॉल, बॅडमिंटन, शुटींग, टेबल-टेनिस, लॉन टेनिस, हॅन्डबॉल, फुटबॉल, बॉक्सींग, कबड्डी, हॉकी, कुस्ती, मार्शल आर्ट इत्यादी  खेळांचा समावेश असणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सायंकाळी ५ ते ७ वाजता पर्यंत राहील. यामध्ये खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण, पुरक व्यायाम, वैद्यकीय तपासणी, आहार, झुम्मा, ॲरोबिक्स याबाबत तज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थ्यांना कार्यालयामार्फत  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणास सहभाग नोंदविण्यासाठी १० एप्रिल पासुन सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात नोंदणी करावी, असे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos