मतदानाला सुरुवात , गडचिरोली जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या, तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचे भविष्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत पक्षांतरासह अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्याने अनेक दिग्गज उमेदवारांसाठी आजची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 
गडचिरोली जिल्ह्यात  दुपारी ३ वाजता पर्यंत मतदान करता येणार आहे. यामुळे सकाळपासून उत्साहात मतदान सुरु आहे. अनेक गावांमध्ये सकाळपासून रांगेमध्ये उभे राहून मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मतदानाचा हक्क बजावला. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-21


Related Photos