जिल्ह्यातील पावणे तीन लाख मतदारांना १६६ क्रमांकावरुन जिल्हाधिकाऱ्यांचे मतदान करण्याचे आवाहन


- टेक्स्ट मॅसेजद्वारेही कळविली मतदानाची वेळ 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व आवाहन करण्यासाठी  निवडणूक विभागाकडून अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. यातच मतदानाच्या एक दिवस अगोदर जिल्हाधिकारी यांनी स्वत:च्या आवाजात जिल्ह्यातील पावणे तीन लक्ष मतदारांना ऑडीओ मॅसेज  दिला. तसेच मतदानाची वेळ ३ वाजेपर्यत असल्या कारणाने सर्वांना लक्षात रहावे यासाठी टेक्स्ट मॅसेजही करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील २ लक्ष ७० हजार मतदारांना सदर संदेश दिल्यामुळे निश्चितच मतदान टक्केवारी वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. हा उपक्रम राज्यात फक्त गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक प्रविण गुप्ता यांनी याबाबत दोन दिवसापुर्वीच बैठकीमध्ये याबाबत अभिनंदन करुन स्वीप कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-20


Related Photos