उद्या विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर पावसाचे सावट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानावर पावसाचे सावट असणार आहे. शुक्रवारपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारीही विविध ठिकाणी पाऊस कोसळला.  उद्याही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून अनेक मतदार मतदानासाठी बाहेर पडणार नाहीत अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे.   
मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी दिवसभर पावसाची रिपरिप राहील, तर दक्षिण महाराष्ट्रात अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी राज्यभरातील मतदान केंद्रांवर जय्यत तयारी ठेवण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने पथनाटय़े तसेच अनेक माध्यमांमधून जनजागृतीही करण्यात आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे हा पाऊस पडत आहे. हा पट्टा आणखी गडद होण्याची चिन्हे असल्याने पुढचे दोन दिवस राज्यात पावसाची हजेरी राहील अशी माहिती स्कायमेने   दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-20


Related Photos