महत्वाच्या बातम्या

 दीड लाखाची लाच घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेच्या तिघांना अटक 


- अनुकंपातत्त्वावर घेतलेल्या मुलास नोकरीवरून काढण्याची धमकी देत मागितली रक्कम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वडिलांच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या जागेवर अनुकंपातत्वावर मुलाला नोकरी देण्यात आली. नोकरी देताना १ लाख रुपये घेण्यात आले. यानंतर परत मुलाला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत दीड लाखाची मागणी केली. मुलाच्या फिर्यादी आईने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून सापळा रचून एसीबीने शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष, सचिवासह सचिवाच्या शिक्षिका पत्नीस लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. मधुकर मोतीराम मोहुर्ले, मंगला मधुकर मोहुर्ले आणि मोतीराम सखाराम मोहुर्ले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार महिला ही गिरगाव ता. नागभीड येथील रहिवाशी आहे. तक्रारदार हिचे पती हे मरण पावले असून ते सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गिरगाव येथे शिपाई पदावर कार्यरत होते. सावित्रीबाई फुले विद्यालय तथा जुनिअर कॉलेज गिरगाव येथे तक्रारदार हिच्या पतीच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर मुलास शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली. नोकरी देताना १ लाख रुपये फिर्यादी महिलेकडून स्वीकारण्यात आले. यानंतर परत ३१ मार्च रोजी फिर्यादी महिलेला फोन करून तुमच्या मुलास प्रोबेशन कालावधीत नोकरीवरून काढून टाकायचे नसल्यास आणी त्यांना कायम नियुक्त करायचे असल्यास बारा लाख रुपये देण्याची मागणी केली.

तक्रारदार यांनी एसीबीकडे याची तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणीदरम्यान, दरम्यान आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुसऱ्या पडताळणीत संस्थेचे अध्यक्ष यांच्याबरोबर तडजोडीअंती सध्या बारा लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये लाच रक्कम देण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, सोमवारी एसीबीने सापळा रचला. यावेळी दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करून तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

एसीबी नागपूर परिक्षेत्राचे राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या नेतृत्वात पलीस निरीक्षक प्रशांत पाटील, वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांच्या पथकाने केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos