व्याहाड खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात दारूसाठा आढळल्याने खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली :
  ऐन निवडणूकीच्या तोंडावर तालुक्यातील व्याहाड खूर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयातच दारूच्या जवळपास ३० पेट्या आढळून आल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. ही दारू चक्क ग्रामपंचायतीच्याच इमारतीमध्ये आढळून आल्यामुळे नेमकी कोणी ठेवली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दारूसाठा काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी ठेवल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. 
सावली पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ग्रामपंचायतीवर धाड टाकली. यावेळी  ग्रामपंचायतीच्या पडक्या इमारतीत  चुंगड्यांमध्ये दारू आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरपंच आणि ग्रामसेवकांची चौकशी सुरू केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मतदान अवघ्या एका दिवसावर येउन ठेपले असताना ग्रामपंचायतीमध्येच दारू आढळून आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ही दारू नेमकी कोणाची आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. याबाबत सावली पोलिसांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-19


Related Photos