निवडणुकीत १ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा वापर होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई  :
राज्यात २१ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून  २८८ मतदारसंघात   १  लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक- व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) पाठविण्यात आले आहेत.
या निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील ९६ हजार ६६१ मतदान केंद्रावर १ लाख ८० हजार मतदान यंत्र (ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन), १ लाख २७ हजार नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक) आणि  राखीव यंत्रेही पाठविण्यात आली आहेत.
निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून सर्वप्रथम लोकसभा  निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर  करण्यात आला होता. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-10-19


Related Photos