महत्वाच्या बातम्या

 १० एप्रिल रोजी निवडणूक खर्चाची द्वितीय लेखे तपासणी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची द्वितीय निवडणूक खर्च लेखे तपासणी १० एप्रिल रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे ही तपासणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. सर्व उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ही तपासणी करून घेण्याचे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे.

नागपूर लोकसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक गुरु भाष्यम तर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक अनुनय भाटी आणि मनीष द्विवेदी यांच्या उपस्थितीत ही तपासणी होईल. या लेखे तपासणीसाठी अनुपस्थित राहणा-यांविरुद्ध निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील बाब क्र. ७७ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos