महत्वाच्या बातम्या

 नागपूर : ग्रामीण परिसर नो ड्रोन झोन घोषीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर ग्रामीण परिसरात ९ ते १० एप्रिलपर्यंत नो ड्रोन झोन घोषीत करण्यात आला असून तसे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १४४ अन्वये नागपूर ग्रामीण हद्दीत विनापरवाना व बेकायदेशिररित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापर करण्यास नमूद कालावधीत मनाई राहील. याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी व सुरक्षेच्या कारणास्तव उक्त कृत्यांना प्रतिबंध राहील.





  Print






News - Nagpur




Related Photos