कार्यकर्ते भाऊ, साहेब , दादा, बाबा येणार म्हणतात पण मतदारांच्या मनात काय?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाचा दिवस जवळ आला आहे. तसतशी रंगत वाढत चालली आहे. आता मतदान अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेवले आहे. यामुळे आजपासून प्रचार सुध्दा बंद होत आहे. अशातच आता गुप्त प्रचार करून मतांची गोळाबेरीज करण्याला उमेदवार आणि कार्यकर्ते सुरूवात करीत आहेत. सध्या उमेदवरांच्या अवती भवती असणारे कार्यकर्ते आपलेच भाऊ येणार ,  दादा येणार, आपलेच बाबा येणार, आमचे साहेबच फिक्स आहेत, असे सांगून मतदारांची सहानूभुती मिळविताना दिसत आहेत. मात्र मतदारांच्या मनात काय आहे, हे येत्या २४ ऑक्टोबरलाच कळणार आहे 
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात निवडणूकीचा रंगारंग माहोल सुरू आहेत. हवसे - नवसे अनेक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. आपआपल्या परीने वेगवेगळे मुद्दे समोर आणून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आज प्रचार थांबविला आहे. सर्वच प्रयत्न करतात. मात्र शेवटी विजय एकाचाच होतो. निवडणूका लढण्यासाठी अनेकजण आपले होते, नव्हते गमावतात. कर्जबाजारी होतात. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी खर्च करावे लागते तेव्हाच ते अवती  - भवती दिसून  येतात. कार्यकर्त्यांच्याच बळावर निवडणूकही लढविली जाते. मात्र हेच कार्यकर्ते उमेदवारांना इतके कंगाल बनवितात की, पुढची निवडणूक येईपर्यंत अनेक उमेदवार स्वतःला सावरूही शकत नाहीत. अनेकदा निवडणूक हरल्यानंतर उमेदवार उद्विग्न होऊन काही महिने कुणाशीही संपर्क साधत नाहीत किंवा पराभवाचे खापर जवळच्या व्यक्तीवर फोडले जाते. 
निवडणूकीच्या कार्यकाळात मात्र मतदार सर्वच पक्षांच्या चकरा, भाषणे, आरोप - प्रत्यारोप आदींचा आस्वाद घेत असतात. शेवटी ‘सबकी सुनो - अपनी करो’ याप्रमाणे आपल्या मनात असलेल्या उमेदवारालाच मतदान करतात. असेच काहीसे आता २४ ऑक्टोबरलाही पहायला मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. असे असले तरी या जिल्ह्यात इतर समाजाच्या मतदारांची संख्या अधिक आहे. यामुळे इतर समाजाला अनुसूचित जमातीच्याच्याच उमेदवाराला निवडून देणे असल्यामुळे कोणीही येउ द्या, आम्हाला काय, असे अनेकजण बोलताना दिसून येतात. तरीही राजकीयदृष्ट्या पहायला गेल्यास काही प्रमाणात चुरस दिसून येत आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-19


Related Photos