महत्वाच्या बातम्या

 कन्या शाळा कुनघाडा (रै.) च्या विद्यार्थ्यांनी घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या विषयी आपण केवळ वर्तमानपत्रात वाचतो. त्यांना आजवर फक्त वर्तमानपत्र, टीव्ही मध्येच बघितले आहे. त्यांचे नाव सामान्य ज्ञान मध्ये रोज घेतो. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली तर काय होणार ! किती सुखद आणि अविस्मरणीय क्षण असणार तो ! असाच काही सा आनंदाचा धक्का मिळाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेच्या मुलींना.

४ एप्रिल २०२४ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा (रै.) च्या ५ नवोदय पात्र यशस्वी विद्यार्थिनीं आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली माननीय आयुषी सिंग यांची भेट घेतली.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा (रै.) च्या सलग पाच वर्षात अठरा विद्यार्थिनींनी नवोदय मध्ये आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. या यशाबद्दल कौतुक करत असताना आयुषी सिंग यांनी शाळेचे कौतुक केले.

यावेळी नवोदय साठी परिश्रम घेणाऱ्या मार्गदर्शक शिक्षक व शाळांना शुभेच्छा दिल्या.

सीईओ यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधत त्यांना पुढे भविष्यात काय बनायचे आहे. याविषयी विचारणा केली आणि विद्यार्थिनींना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी व्हा, अश्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या भौतिक आणि गुणवत्ता विकासासाठी शाळेला आवश्यक त्या  सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटीने विद्यार्थी खूप भारावून गेले आणि ही १५ ते २० मिनिटांची भेट त्यांना यशस्वी आयुष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी राहणार आहे. अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्यांचे कौतुकाचे दोन शब्दही पुढे अजून जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरतात. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos