महत्वाच्या बातम्या

 नियमित पिक कर्जाचा भरणा करणारे शेतकरी वाऱ्यावरच


- तब्बल दोन महिण्याचा कालावधी लोटुन अद्यापही सानुग्राह अनुदान नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित पिक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयाच्या मर्यादेत सानुग्राह अनुदान जाहिर करण्यात आले होते. राज्यात सत्तापालट झाल्याने कृषी दिनापासुन देय सानुग्राह अनुदान रखडल्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणविस सरकारने २७ जुलै २०२२ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकित निर्णय घेतला  होता. मात्र सदर अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळती करण्यातच आली नसल्याने व याबाबतचे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत असल्याने एकुणच नियमित पिक. कर्जाचा भरणा करणारे शेतकरी अद्यापही वाऱ्यावरच आहेत.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे१३.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु.५७२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे सुचविण्यात आले होते. तसेच या योजनेचा लाभ २०१९ मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या

शेतकऱ्यांना सुध्दा घेता येईल, एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ देण्यात येणार असल्याचे सुचित करण्यात आले होते.दरम्यान नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८,२०१८-१९ आणि २०१९-२०हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोनआर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली होती.

मात्र या कालावधीस दोन महिण्याचा कालावधी लोटला असताना संबंधित विभागाकडे निधीच प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात येत असल्याने एकुणच येथील शेतकरी पुरते संभ्रमात असुन विद्यमान राज्य शासनाने केलेली घोषणा जुमला तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित केल्या जाऊ लागली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos