महत्वाच्या बातम्या

 गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा आणखी वाढणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : राज्य शासनाने आरटीई कायद्यात बदल केल्यानंतर एक महिन्याने आरटीई पाेर्टलवर शाळांची नाेंदणी करणे आणि रिक्त जागा अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली.

मार्च महिन्यात त्यास वेळाेवेळी मुदतवाढ देण्यात आली. पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात करण्याऐवजी शाळा नाेंदणीस पुन्हा १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आरटीई पाेर्टलवर ७ एप्रिल राेजी ७५ हजार ९५२ शाळांची नाेंदणी झाली असून, तब्बल ९ लाख ७२ हजार ६९१ रिक्त जागा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. अनेक दिवसांपासून पाेर्टलवर शाळा तसेच आरटीईअंतर्गत २५ टक्के रिक्त असलेली विद्यार्थी संख्या जैसे थे असल्याचे दिसून येत आहे, तरीही पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आरटीई पाेर्टलवर शाळा नाेंदणीची प्रक्रिया पूर्ण करून रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे.

रिक्त जागांचा आकडा दहा लाखांपर्यंत -

- फेब्रुवारी महिन्यात आरटीई कायद्यात बदल केला. त्यानंतर एक महिन्याने ४ मार्च राेजी पाेर्टलवर शाळा नाेंदणीस सुरुवात केली. शासकीय आणि अनुदानित शाळांना पाेर्टलवर नाेंदणीला संधी दिली आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत रिक्त जागांचा आकडा दहा लाखांपर्यंत गेला आहे.

- शासनाकडून शाळा नाेंदणीस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्य शासन आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. तसेच, आरटीई कायद्याची प्रभावी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.





  Print






News - Rajy




Related Photos