आज दुपारी ३ वाजता प्रचार तोफा थांबणार, आता गुप्त प्रचाराचा धडाका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येत्या २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. यामुळे मतदानाच्या ४८ तासाआधी प्रचार थांबविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे आज १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता उमेदवारांना प्रचार थांबवावा लागणार आहे. खुला प्रचार थांबल्यानंतर आता आजपासून गुप्त प्रचाराला वेग येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत आहे. याबाबत निवडणूक विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. उमेदवारांनीही प्रचारादरम्यान निवडणूकीची वेळ मतदारांपर्यंत पोहचविली आहे. प्रशासन निवडणूकीच्या कामासाठी सज्ज झाले आहे. पोलिंग पार्ट्याही आज रवाना करण्यात येणार आहेत. काही दुर्गम मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना पोहचविण्यासाठी हेलिकाॅप्टरची सोयही करण्यात आली आहे. आज कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान पार्ट्या मतदान केंद्रावर पोहचणार आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-19


Related Photos