महत्वाच्या बातम्या

 निर्भय मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा : मुख्य निवडणूक निरिक्षक अभय नंदन अंबास्था


- क्षेत्रिय अधिकारी प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात काम करण्याची जबाबदारी एकट्याची नसून प्रत्येकांनी आपली जबाबदार कर्तव्य म्हणुन पार पाडावी. मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, काही अडचण असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा असे, आवाहन ०८ वर्धा लोकसभा मतदार संघाचे मुख्य निवडणूक निरिक्षक अभय नंदन अंबास्था यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वर्धा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघातील नियुक्ती करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, प्रशिक्षण नोडल अधिकारी सायली सोळंके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास शिरसाट, गंधे आदी उपस्थित होते.

निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बऱ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यापूर्वीचा अनुभव असून त्यांना इतरांना मार्गदर्शन करण्यासोबतच क्षेत्रीय कामकाजाच्या मार्गदर्शन पुस्तिकेचा अभ्यास करुन कामे करावी. कामामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय करु नये, अशा सुचना अभय नंदन अंबास्था यांनी यावेळी प्रशिक्षणास उपस्थित सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या.

मतदान केंद्रध्यक्षांना नेमून देण्यात आलेल्या कामांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कामे करुन  पारदर्शकपणे कामे करावी. कुठल्याही अफवावर विश्वास ठेऊ नये. निवडणूकीच्या कामात त्याच मतदार संघात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र (EDP) प्राप्त करुन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून  निवडणूक कामात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र उपलब्ध करुन  मतदान करावे, असे आवाहन राहुल कर्डिले यांनी केले आहे.

यावेळी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कामकाजाविषयी व कर्तव्याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास वर्धा लोकसभा मतदार संघातील, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी-पुलगाव, धामणगाव व मोर्शी या विधानसभा मतदार संघातील नियुक्त करण्यात आलेले क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos