काॅंग्रेसला झटका, प्रदेश काॅंग्रेसच्या माजी सचिव सगुणा तलांडी यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच जिल्ह्यात काॅंग्रेसला मोठा झटका बसला आहे. प्रदेश काॅंग्रेसच्या माजी सचिव तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून काॅंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या नेत्या सगुणा तलांडी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
आज १८ ऑक्टोबर रोजी आलापल्ली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर भाजपाचे उमेदवार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या वेळी सगुणा तलांडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सभेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, खा. अशोक नेते, आ. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम,  आ. रामदास आंबटकर, आ.डाॅ. देवराव होळी, अहेरीच्या नगराध्यक्षा, प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते.
सगुणा तलांडी ह्या मागील अनेक वर्षांपासून काॅंग्रेसमध्ये होत्या. २०१४ च्या निवडणूकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून त्यांना काॅंग्रेसने उमेदवारी दिली होती. यावेळी भाजपाचे उमेदवार डाॅ. देवराव होळी यांनी त्यांचा पराभव केला होता. आता सगुणा तलांडी ह्या काॅंगेस सोडून भाजपमध्ये गेल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपाला जमेची बाजू झाल्याचे बोलल्या जात आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-18


Related Photos