महत्वाच्या बातम्या

 निवडणूक कामात जास्त ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची नेमणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कमी वयाच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रशिक्षणामधून वगळण्यात आले. 

देसाईगंज-आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निर्वाचन विभाग सज्ज झाला असून निवडणुकीच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले. 

देसाईगंज येथील नगरपरिषद सांस्कृतिक भवनात पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले होते. परंतु दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी बऱ्याच कमी वयाच्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते. 

यामुळे जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्या हा अती दुर्गम भाग असल्यामुळे बऱ्याच पोलिंग पार्टीला बऱ्याच लांब पायी चालावा लागते. त्यामुळे वयस्कर कर्मचाऱ्यांना बऱ्याच गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कमी वयाच्या कर्मचाऱ्यांना नवघळता, जास्त वयांच्या कर्मचाऱ्यांना वगळावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos